५ श्रावण दिन विशेष

श्रावण महिना हा हिंदू पंचांगा नुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिके नुसार वर्षातला पाचवा महिना आहे.

 या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.

खगोलीय महत्व: भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो आणि सौर वर्षाचा पाचवा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो. श्राबोन (बंगाली: শ্রাবণ; श्रवण देखील म्हणतात) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे. तसेच नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतुचा (पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो.

अधिक श्रावण

        साधारणतः ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी अधिक श्रावण येतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत.

        अधिक श्रावण असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१...वगैरे.

सणांचा राजा

        श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हणले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!