माझी मराठी भाषा Maazi Marathi Bhasha:- माझी मराठी भाषा ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे, आणि म्हणून माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे.
माझी मातृभाषा माझा अभिमान ..!
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. ह्या देशाला अतुलनीय अशा निसर्गाची देणगी लाभलेली आहे. त्याचबरोबर अनेक परंपरा आणि बोलीभाषा असणारा हा आपला महान देश. येथे दर ५ मैलावर लोकांचे राहणीमान आणि भाषा बदलते.
विकिपिडीयावरील माहीतीनुसार, आपल्या भारतात जवळपास १२२२ बोलीभाषा आहेत त्यातील २३४ या मातृभाषा आहेत. प्रत्येकाला आपल्या आईवडिलांचा जसा अभिमान असतो तसाच भाषेचाही असतो आणि तो असायलाच हवा. आपण ज्या भाषेत उत्तम विचार करु शकतो त्या भाषेला दुय्यम लेखणे हे चुकीचेच.
आपल्या भारतात अनेक भाषा आहेत त्यामुळे त्यातील जास्तीत जास्त भाषा शिकल्या तर उत्तमच त्यामुळे इतर राज्यात संवाद साधताना कोणताही अडथळा येत नाही. परंतु त्यामुळे आपल्या मातृभाषेचे महत्त्व कमी होत नाही. भारतातील प्रत्येक राज्यात नोकरी धंद्यासाठी बरेच लोक स्थलांतरण करून येतात. त्यांच्याशी संवादासाठी आपण हिंदी भाषा वापरतो कारण ती राष्ट्रभाषा आहे म्हणुन ती सर्वांना समजते परंतु त्या भाषेचा वापर हा गरजेपुरता असेल तर ठीक सवय करुन घेणे आणि समोरच्या व्यक्तीसाठी आपला प्राधान्यक्रम बदलणे चुकीचेच. कोणत्याही राज्यात जर येत - जात असाल तर तेथील भाषा येणे गरजेचे आहे ती भाषा शिकायलाच हवी. भाषा शिकल्याने उलट आपल्याच ज्ञानात भर पडेल. हे न करता आपण भाषेचा अभिमान असलेल्यांची तक्रार करत बसतो.
बऱ्याच काही लोकांच मत असते की सर्वांना समजणारी भाषा आपण बोलायला हवी. परंतु प्रत्येकाने विचार करायला हवे की आपण ज्या ठीकाणी वास्तव्याला आहोत किंवा जी आपली कर्मभुमी आहे तेथील निदान भाषा जरी आत्मसात केली तर आपलाच फायदा आहे. आपण तेथील लोकांची भाषा बोलत असू तर ते सुध्दा तितक्याच आपुलकीने आपल्याशी संवाद साधतात.
इतर राज्यात भाषेचा अभिमान हा मोठ्या प्रमाणात असताना दिसून येतो. आपण महाराष्ट्रवासी यात कुठेतरी कमी पडतोय असे नेहमीच वाटते. मुंबईत राहणारे मराठी लोक तर एकमेकांशी हिंदीमध्ये संवाद साधताना बघायला मिळतात. त्यांना स्वतःची भाषेचा कमीपणा वाटतो. आणि मग समर्थन करायला मुद्दे कमी पडले की इंग्रजी भाषेवर येतात. इंग्रजी ही बाहेरील देशात संवाद साधण्यासाठी उत्तम भाषा समजली जाऊ शकते पण आपण त्या भाषेला एवढ अवाजवी महत्व देतो की एखाद्याला जर येत नसेल तर त्याने काही गुन्हा केलाय अशी वागणूक देतो.
स्वतःची मातृभाषा वापरणे हे अभिमानस्पद आहे मग ती मराठी, हिन्दी, तमिळ, तेलगु, गुजराती किंवा कोणतीही भाषा असुदे. आणि प्रत्येकाने इतरांच्या भाषांचा आदर करायला हवा. लक्षात असायला हवे की इतर भाषांचा अपमान करुन आपली भाषा मोठी होणार नाही त्यासाठी तिचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.
आमच्या बद्दल
माझी मराठी भाषा डॉट कॉम www.maazimarathibhash.com :- येथून आपण आपला विकास साधण्यासाठी स्टार्ट अप, एमएलएम, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या संबंधित आणि डिजिटल इंडिया, स्वच्छता व स्वास्थ्य, वास्तुशास्त्र याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळवू शकता.
Welcome to My Website
This is a sample paragraph on my webpage.