कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे काय? What is the Cancer?

कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.

प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवा मध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेvनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.

कर्करोगाचे प्रकार :

बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. 

    ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.

मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. 

    कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.

जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसऱ्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.

कर्करोगाचे ऊतीवरून केलेले प्रकार- शरीरातील उतीॅंवरून कर्करोगाचे तीन प्रकार केलेले आहेत.

1) संयोजी ऊतीना होणारा कर्करोग उती अर्बुद किंवा सारकोमा. या प्रकारातील कर्करोग स्नायू, अस्थि आणि रक्तवाहिन्यामध्ये होतो.

2) अपिस्तर उऊना होणारा कर्करोग ‘कार्सिनोमा’ अभिस्तर ऊती कर्करोग किंवा कर्क अर्बुद स्तने, बृहदांत्र,आणि फुफ्फुस अशा अवयवांमध्ये होतो.

3) ल्युकेमिया आणि लिंफोमा हा अस्थिमज्जेमधील रक्तपेशीना होणारा कर्करोग आहे. कधी कधी तो लसिका ग्रंथीमध्ये आढळतो.

    आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.

कर्करोगाचे मुख्य प्रकार :

कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणाऱ्या कर्करोगाचे नाव.

सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.

ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.

लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.

सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाची वाढ :

    क्ष किरण चिकित्सा किंवा प्रत्यक्ष पाहणीमधून लक्षात आलेली गाठ लक्षात येईपर्यॅंत बरीच वर्षे झालेली असतात . उतीच्या प्रकाराप्रमाणे कर्करोगाच्या गाठीच्या वाढीच्या वेगामध्ये फरक आहे. बिनाइन ट्यूमर हा कर्करोग शरीरातील एखाद्या ठिकाणी म्हणजे कर्करोगाची प्राथमिक अवस्था. काही तज्ज्ञांच्या मते ही कर्करोगपूर्व स्थिति आहे. एका ठिकाणी आणि आवरण असणाऱ्या बिनाइन ट्यूमरच्या गाठी आसपासच्या अवयवामध्ये सह्सा पसरत नाहीत. पण अशा गाठी वाढ्ण्याची आणि शेजारील अवयवामध्ये पसरण्याची शक्यता असल्यानेत्या शस्त्रक्रियेने काढून टाकतात. काही कर्करोग एकाच ठिकाणी तर काही ठराविक भागात असतात. ठराविक भागामध्ये असलेल्या गाठी पसरण्याची अधिक शक्यता असते. पसरणाऱ्या गाठी मेटॅस्टॅटिक म्हणजे लसिकावाहिन्यामधून आणि रक्तवाहिन्यामधून शरीराच्या दूरवरच्या भागामध्ये नवीन गाठी निर्माण करतात.

कर्करोगावर उपचार :

    कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सरांमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते.

    असे असले तरी डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीस कॅन्सर का झाला हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता धूम्रपानामुळे वाढते. पण धूम्रपानामुळे कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयुष्यात कधीही सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीस कदाचित फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कारणांच्या जवळपास कधीही नसलेल्या व्यक्तीस सुद्धा कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.

    कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णापासून तो दुसऱ्या रुग्णामध्ये संक्रमित होत नाही. पण अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. कधीकधी डोक्याला लागलेल्या टेंग़ळामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यासाठीच्या कारणापासून तुम्ही दूर राहू शकता. आनुवंशिक कारणानी कधीकधी कॅन्सर होतो. पण बहुतेक कॅन्सर होण्यामागे पर्यावरणातील काही घटक कारणीभूत आहेत. आपले खाणे, पिणे, सिगरेट ओढणे, कॅन्सर कारकांचा संपर्क उदाहरणार्थ किरणोत्सर्ग आणि पर्यावरणातील काही विषारी पदार्थ. सिगरेट आणि अल्कोहोलमुळे चाळीस टक्के कॅन्सर झाल्याचे सिद्ध झाले आहे. तेहतीस टक्के कॅन्सर नको ते पदार्थ खाण्यात आल्याने होतात.

    माता पित्याकडून आलेला जनुकीय वारसा, वय, लिंग, आणि वंश ही कॅन्सर उद्भवण्यामधील आणखी काही कारणे. या कारणापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही तरी, कॅन्सर उद्भवण्यामधील काही कारणापासून दूर ठेवणे शक्यआहे. कॅन्सरच्या पर्यावरणीय घटकापासून दूर राहता येते. डॉक्टर यासाठी लागणारा सल्ला देऊ शकतात. अधून मधून कॅन्सरसाठीची तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होते. अशा चाचण्या लाभदायक आहेत की नाहीत हे डॉक्टर उत्तमपणे सांगू शकतो.

कर्करोगाची शक्यता खालील कारणानी वाढते:

तंबाखू कर्करोगामुळे होणाऱ्या तेहतीस टक्के – एक तृतीयांश मृत्यू तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. तंबाखू ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो, तेवढी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेट्स ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीपेक्षा दहा पटीनी अधिक असते. याशिवाय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्याया व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. धूर विरहित तंबाखू ओढल्यास कर्करोगपूर्व ऊतीं मधील झालेले बदल बहुतेक वेळा सामान्य होतात. क्लोरीनयुक्त पाणी हेही वाढत्या कर्करोगांचे कारण आहे.

आहार

    अति तेलकट आहाराचा आणि मोठे आतडे, गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरचा संबंध आहे असे काही प्रमाणात सिद्ध झाले आहे. तरीपण यावर झालेल्या संशोधनामधून हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. उदाहरणार्थ तेलकट पदार्थ खाण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा संबंध निर्विवादपणे जोडता येत नाही.

    आहारातील एकूण मेदाम्लाचे कर्करोगाशी सरळ संबंध जोडता आला नाही तरी आहारामधील जादा उष्मांकाचा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आहे असे आकडेवारी सांगते. अधिक उष्मांकाचे अन्न घेतल्यानंतर मासिकपाळी कमी वयात सुरू होते. नंतरच्या आयुष्यात अधिक मेदाम्लांचे सेवन केल्याने लठ्ठ्पणा येतो. लठ्ठ्पणामुळे शरीरातील स्त्री संप्रेरकाचे –इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

    योग्य आहार घेतल्याने काही प्रकारचे कर्करोगापासून संरक्षण मिळते. तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्वे, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. आहारामध्ये ताजी फळे पालेभाज्या, कोंड्यासह बनविलेला ब्रेड, कडधान्ये, पास्ता, तांदूळ आणि घेवडा यांचा समावेश आवश्यक.

    अतिनील किरण आणि किरणोत्सार. अतिनील किरणामुळे त्वचेचा कर्करोग होतो. त्वचा तपकिरी किंवा काळी करण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम अतिनील किरण उपकरणे यामुळे त्वचेचे नुकसान होते. आणि त्वचेच्या कर्करोगाचा घोका वाढतो. अतिनील किरणामुळे होणाऱ्या त्वचा कर्करोगाच्या शक्यतेपासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय करता य्रेतात.

  • त्वचा संरक्षक क्रीम वापरणे. अशा क्रीममध्ये त्वचा संरक्षक घटक १५% किंवा त्याहून अधिक प्रभावी असावा. हे क्रीम दिवसातून दोनदा उघड्या त्वचेवर चोळतात. घाम आल्यानंतर आणि पोहून झाल्यानंतर क्रीम आणखी एकदा लावतात.. तीव्र उन्हाळ्यात जेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक आहे अशा ठिकाणी दर दोन तासानी सन स्क्रीन क्रीम लावल्यास फायदा होतो. समुद्र किनाऱ्यावर जेथे हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण कमी असते तेथे अतिनील किरणांची तीव्रता अधिक असते.
  • दिवसा १० ते दुपारी चार पर्यंत सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणे टाळावे. उन्हामध्ये केव्हा जावे यासाठीचा एक सोपा नियम म्हणजे स्वतःच्या लांबीपेक्षा सावली जेव्हा लहान असेल तेव्हा उन्हामध्ये उभे राहू नये.
  • मोठ्या काठाची हॅट वापरावी.
  • अधिक वेळ उन्हामध्ये उभे रहावयाचे असल्यास अंगभर पूर्ण कपडे घालून उन्हामध्ये जावे. अधूनमधून सावलीत उभे रहावे. डोळ्यावर अतिनील किरण प्रतिबंधक गॉगल घालावा.
  • गोरेपणा कमी करण्यासाठी अतिनील किरण उपचार केंद्रामध्ये (टॅनिंग सेंटर मध्ये) जाणे टाळावे.
अल्कोहोल- अति मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये तोंड, घसा, अन्ननलिका, स्वरयंत्र आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासात केवळ एक औंस (अंदाजे साठ मिली) एवढे मद्य घेणाऱ्या व्यक्तीमध्ये स्तनांच्या कर्करोग़ाची शक्यता वाढल्याचे दिसून आले. तुम्ही मुळीच अल्कोहोल घेत नसाल तर नव्याने अल्कोहोल घेण्याची सुरुवात करण्याचे कारण नाही.

किरणोत्सर्ग- आयनीभवन करू शकणाऱ्या विकिरणामुळे उदा०, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे, किरणोत्सारी धातूंच्या संपर्कात येणे, अवकाश प्रवासाच्या वेळी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर किंवा आत येणे ज्यामध्ये विश्वकिरणांच्या संपर्कात येणे किंवा अपघात यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जपानमध्ये अणुबॉम्ब स्फोटानंतर तीव्र किरणोत्सार झाला. ज्या व्यक्ती स्फोटातून वाचल्या त्याना कॅन्सरला तोंड द्यावे लागले. क्ष किरण तपासणी करताना रुग्ण फार थोड्या वेळेपुरता आणि कमी क्षमतेच्या किरणोत्सारास सामोरे जातो. तसेच कॅन्सरवरील उपचाराचा भाग म्हणून ठराविक तीव्रतेचा किरणोत्सार कॅन्सर गाठीवर सोडला जातो. त्याच्या परिणामांची आणि उपचाराची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देऊ शकतात.

    रसायने आणि कर्करोगकारक काही रसायने- कीटकनाशके आणि धातू यांच्या संपर्कात आल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. ॲजबेस्टॉस, निकेल, कॅडमियम, युरेनियम, रॅडॉन, व्हिनिल क्लोराईड, बेंझिडिन, आणि बेंझीन ही रसायने कॅन्सरचे कारक असल्याचे ठाऊक आहे. अशा रसायनांच्या संपर्कात काम करावे लागत असेल तर सुरक्षेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.

संप्रेरक उपचार पद्धत- (एचआरटी) हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी- ऋतुनिवृत्तीनंतर काही स्त्रियामध्ये काही स्त्रियामध्ये चेहऱ्यावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे किंवा योनी कोरडी पडणे अशा तक्रारीवर ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे उपचार केले जातात. अशा उपचारानंतर मिळालेले कॅन्सरचे निष्कर्ष मिश्र स्वरूपाचे आहेत. ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे मिश्र उपचार घेतलेल्या स्त्रियामध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोका फक्त इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांहून वाढलेला दिसला. पण इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून आला. एच आर टी उपचार घेणाऱ्या स्त्रियानी आपापल्या डॉक्टरशी याबाबत बोलणे आवश्यक आहे.

डाय एथिल स्टिल्बेस्ट्रॉल ( डीईएस)- डाय एथिल स्टिल्बेसस्ट्रॉल हे एक कृत्रिम स्टेरॉईड संप्रेरक आहे. गर्भारपणातील काही प्रॉब्लेम दूर करण्यासाठी हे वापरण्यात येते. पण डायएथिल स्टिल्बेस्ट्रॉलच्या वापराने गर्भाशयमुख आणि योनिमार्गामध्ये काही अस्वाभाविक पेशी उत्पन्न झाल्याचे आढळले. याशिवाय डीईएस वापरणाऱ्या स्त्रियामध्ये एक विरळा योनिमार्गाचा आणि गर्भाशयमुखाचा कॅन्सर आढळला. डीईएस १९५० ते १९७१पर्यंत वापरात होते. यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रियामध्ये स्तनाच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. याचा वापर चालू असता ज्या स्त्रियांना मुली झाल्या त्या मुलीमध्ये जन्मानंतर स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले. ज्या स्त्रियांना मुलगे झाले त्यामध्ये नेहमीपेक्षा लहान अंडकोश तयार होणे किंवा अंडकोश अंडपिशवीमध्ये न उतरणे अशास सामोरे जावे लागले.

    काही कर्करोग उदाहरणार्थ मेलॅनोमा, स्तन, बीजांड, प्रोस्टेट, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग काही कुटुंबांमध्ये अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसले. हा प्रकार जनुकीय वारशाचा इतर कौटुंबिक वातावरणाचा किंवा खाण्यापिण्याच्या सवयीचा आहे की कसे यावर एकमत झालेले नाही. सामान्य पेशी विभाजनाच्या वेळी जनुका मध्ये आकस्मिक बदल होऊन कॅन्सर होतो. जनुका मधील बदल होण्यास जीवनशैली किंवा पर्यावरणातील काही कारणांचा सहभाग असावा. काही बदल मातापित्या कडून अपत्याकडे जनुकीय वारशाच्या स्वरूपात येत असावेत. जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल मुलामध्ये असले म्हणजे त्याला कॅन्सर होईलच असे नाही. फक्त त्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक.. एवढेच. ..

उपचार

कर्करोगावर चार  उपचार पद्धती प्रचलित आहेत :

१ )  नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढविणे. ( Boost Eminutye System )

२ ) रसायनोपचार (Chemotherapy)

३  ) किरणोपचार (Radiotherapy)

४ ) शल्य चिकित्सा (Surgery)

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती. 

=> निरोगी जीवनाचा आधार शुद्ध शाकाहार.

=> कर्करोग टाळण्यासाठी नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढवा. 

स्वीकरण: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती. 
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर  सर्व काही व्यर्थ आहे. 

=> आरोग्यम् धनसंपदा.

    माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!