आधार कार्ड मोबाईल ऍप डाऊन लोड कसे करायचे.

आधार कार्डचे मोबाईल ऍप डाऊन लोड कसे करायचे.
   भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्डाची आवश्यकता असते. आधार कार्ड हे भारतातल्या सर्व व्यक्तींचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. हे तुम्हाला विविध सरकारी कामासाठी वापरले जाते त्यामुळे प्रत्येक व्यक्ति जवळ आधार कार्डची प्रिंट नेहमी सोबत ठेवावी लागते. परंतु हे नेहमीच शक्य नसते कारण एखाद्या वेळेला आधार कार्ड घरी विसरले किंवा ते अचानक हरवले तर काय करावे? काही लोकांना ही पद्धत माहीत नसते आणि ते घाबरून जातात, पण आपला मोबाईल नेहमी आपल्या सोबत असतोच. UIDAI ने आता अशी पद्धत मोबाईल ऍप द्वारे उपलब्ध करून दिली आहे ते वापरून तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल पाहू शकता.

        आधार कार्डचे मोबाईल ऍप डाऊन लोड करण्यासाठी सर्व प्रथम तुमच्या मोबईलचे नेट सुरू करा व खाली दाखविल्या प्रमाणे तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर (Play Store) आयकॉंनवर क्लिक करून प्ले-स्टोअर उघडा.


त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल त्यावर (Apps) ऑप्शन वर क्लिक करा.

 

    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल त्यावर वरच्या बाजूला सर्च फॉर  (Search for) या ठिकाणी क्लिक करा


    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल व कि बोर्ड दिसेल त्यावर आधार (Aadhaar) असे स्पेलिंग    टाईप करून सर्च बटन वर क्लिक करा.




    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल त्यावर तुम्हाला एम् आधार (mAadhaar) असे सर्च झालेले दिसेल त्यावर क्लिक करा  



    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल व तुम्हाला एम् आधार (mAadhaar) ऍप दिसेल त्यावर हिरव्या रांगाच्या इन्स्टॉल (Install) बटन वर  क्लिक करा


त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल व तुम्हाला एम् आधार (mAadhaar) ऍप डाऊन लोड होतांना दिसेल. हिरव्या रांगाचे वर्तुळ पुर्ण होई पर्यत थांबा



    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल ऍप डाऊन लोड होत आहे हिरव्या रंगाचे वर्तुळ पुर्ण होई पर्यत थांबा



    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल ऍप डाऊन लोड होत आहे हिरव्या रंगाचे वर्तुळ पुर्ण होई पर्यत थांबा

    
    त्या नंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल तुमच्या मोबाईल मध्ये आधार ऍप डाऊन लोड झाले आहे. तुम्हाला हिरव्या रंगाचे ओपन (Open) बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आधार ऍप उघडू शकता. 


    आता तुमच्या मोबाईल मध्ये आधार कार्डचे मोबाईल ऍप पुर्ण पणे डाऊन लोड झालेले आहे. तुमच्या मोबाईल ऍपच्या लिस्ट मध्ये आधार कार्डचा  आयकॉन खालील प्रमाणे दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्डचे ऍप उघडू शकता. 


        मित्रांनो मला वाटते की तुम्हाला सर्व पध्दत समजली असेल. जर ही महिती तुम्हाला आवडली असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. तसेच तुमच्या मित्रांना माहितीची आवश्यकता असेल तर सोशल मिडिया द्वारे शेअर करायला विसरू नका? धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!