Blueberry | अनेक आजारांना दूर ठेवण्यात गुणकारी ‘ब्लूबेरी’, वाचा याचे फायदे…!
ब्लूबेरी खाल्ल्याने आरोग्या संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून त्वचा निरोगी राहते. पण अनेकांना ब्लूबेरीचे नेमके काय फायदे आहेत हे माहित नाही. चला तर जाणून घेऊया ब्लूबेरी खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात.![]() |
(Know the health benefits of blueberry) |
Blueberry | ब्लूबेरी निसर्गाच्या ओल्या आणि थंड वातावरणात फुलणारे, निळसर-जांभळे रंगाचे लहान फळ म्हणजेच ब्लूबेरी. या लहानशा फ असलेले हे फळ आता भारतातही खूप पसंत केले जात आहे. ब्लूबेरीला त्याच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे ‘निसर्गाचा निळा रत्न’ म्हणतात. चला, या आकर्षक फळा बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
फळे आणि हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, यात काही शंका नाही. अशा काही गोष्टी ज्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि दीर्घायुष्य देण्यास उपयुक्त ठरतात, त्यांना सुपरफूड्स देखील म्हणतात. अलीकडेच, संशोधकांनी अशी काही तथ्य सदर केली आहेत, जी असे सूचित करतात की, ब्ल्यूबेरी वृद्धत्वाशी संबंधित समस्या दूर करून आयुष्य वाढवते
संशोधना दरम्यान वृद्धत्वाच्या दोन वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये असे दिसून आले आहे की, ब्ल्यूबेरी माणसाचे आयुष्य वाढवण्यात मदत करू शकते. ब्लूबेरी मध्ये विशिष्ट फ्लॅव्होनॉइड रेणू असतात, जे डीएनए नुकसान आणि मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या हानीचा वेग कमी करतात. बर्याच अभ्यासांमध्ये असा दावा देखील केला गेला आहे की, ब्लूबेरी मेंदूत मेमरीच्या भागास ऑक्सिडंट आणि इन्फ्लेमेटरी नुकसाना पासून संरक्षण करते.