०९ फेब्रुवारी कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांना जयंती.

0

स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

स्वातंत्र्य शाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव - कन्हेर पोखरी ता. पारनेर ( ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडी काम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.

    नाशिक मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.

'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ','सुंदर मी होणार', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.

    प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणाऱ्या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.

 "वसुधैव कुटुम्बकम्"

हे सुद्धा वाचा...!  खालील लिंक वर क्लिक करा.

दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!