८ डिसेंबर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन

0

श्री संत संताजी जगनाडे महाराज जिवन गाथा

ईश्वरदत्त अध्यात्मिक देणगीचे सदैव रक्षण करणारे, त्यांना विस्मृतीचा शाम लागु न देणारे, सुसंस्कृतीचा पुरस्कार करणारे महत्तम पुरुष म्हणजेच आपले संत !

    महाराष्ट्राच्या मातीचे गात जन्मीचे पुण्या म्हणावे इतपत या मातीने विविधांगी संताना जन्म दिला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत महादेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या पाच संतांनी महाराष्ट्राचे पंचरत्न (पंच्यायतन) म्हटले जाते.अशा संत परंपरेच्या मालिकेत संत जगनाडे महाराज यांचे हि महत्व विशेष आहे.

        संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म जगनाडे कुटुंबात विठोबा पंथ आणि मथाबाई या दाम्पत्याच्या पोटी खेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र चाखण येथे श्रावण शुद्ध नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर इ.स.१६२४ साली झाला.त्यांचे घरचे वातावरण अध्यात्मिक व धार्मिक होते. इ.स. १६२८ ते १६३१ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या भयावह दुष्काळामुळे मानवी जीवनाच्या नश्वरतेचे बिज अंतमनात रोवले गेल. एकीकडे वैधीक तत्व ज्ञानाला व इश्वर निष्टेला तडा जायची स्थिती सामान्य जनतेच्या अधिक दैववादी व धर्मांधपणात वाढ या परिस्थितीचा संताजीच्या संस्कारक्षम मनावर खोल परिणाम झाला.

        त्यानंतर इ.स. १९३६ मध्ये विवाहबद्ध होऊन प्रपंचाचे रहाटगाडगे ओढणाऱ्या संताजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली टी १६४० मध्ये. श्री क्षेत्र चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात जानेवारी तील थंडीच्या दिवसात संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला संताजी शोत म्हणून गेले होते.तेथे भावपूर्ण रसाळ अभंगवाणी संताजीच्या कानावर पडली.परस्पर नेत्रांनी एकमेकांना ओळखले.गुरु शिष्यांची भेट झाली अनंत काळाचे वाटसरू इहलोकीच्या मार्गावर भेटले.चक्रेश्वराच्या साक्षीने संताजीनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानले.संताजी यानंतर त्यांच्या सोबत सावली प्रमाणे राहू लागले त्यांच्या मुख कमलातुन निघणारे अभंग आपल्या लेखणीने टिपू लागले.

        संत तुकाराम महाराजांच्या संगतीत त्यांनी अनेक अभंगाची रचना करून स्वयंफुर्त काव्य संग्रहाची गाथा तयार केली.संत तुकारामांना या गाथे मुळे निर्माण झालेली लोकप्रियता पाहून काही समाज कंटकांनी ईर्षे पोटी गाथा इंद्रायणी नदीत फेकुन दिल्या. तुकारामानं याचे मरणप्राय दुःख झाल्याने त्यांच्या साठी संताजीच्या मुखोद्गत असलेले अभंग,गावकऱ्यां कडून गोळा केलेले अभंग यांची जुळवाजुळव केली.अहोरात्र प्रयत्न करून लिखाण केले व तेरा दिवसात अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामांच्या स्वाधीन केली.चार वेध व सहा शास्त्र व अठरा पुराने प्रसिद्ध आहेत तशी हि गाथा पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध आहे.

        इ.स.१६७० मध्ये मोगल सैन्याने चाखण वर हल्ला चढविला तेव्हा संताजींनी जीव धोक्यात घालून संकटावर मात करीत अभंगाचे गाठोडे सर्वांच्या तावडीतून सोडवत,श्री क्षेत्र सदुंबरे येथे आणून ठेवले.संत तुकाराम वैकुंठाला गेल्यावर उदास वाटू लागल्याने इ.स. १६९९ साली त्यांनी ही (वय ७५) श्रीक्षेत्रसदुंबरे येथे देह ठेवला. समाधी स्थळी सर्व गावकऱ्यांकडून महाराजांना समाधी देण्यात येत असता संपूर्ण शरीर मातीत झाकले गेले.परंतु मुखकमल झाकले जात नव्हते.पण अचानक तुकाराम महाराज समाधी स्थळी प्रकट झाले व त्यांनी तीन मुठी माती ठेवली असता मुखकमल झाकले गेले.संताजी समाधिस्त झाले.संत तुका जोडी मध्ये दोघेही जीवंत असताना असे ठरले होते,जे कोणी अगोदर वैकुंठाला जाईल त्याने दुसऱ्यास मुठ माती देण्याकरिता खाली मृत्यू लोकांत यावे.हे खालील अभंगावरून लक्षात येईल.

चरिता गोधन माझे गुंतले वचन
आम्ही येणे झाले एका तेलीया कारण
तीन मुठी मत्तीका देख,तेव्हा लोपविली मुख
आलो म्हणे तुका,संत न्यावया विष्णू लोका

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!