२७ डिसेंबर स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव शामराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

0

 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे डॉ. पंजाबराव शामराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.

डॉ. पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; - दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.

स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव शामराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

हे सुद्धा वाचा.  खालील लिंक वर क्लिक करा.

=> स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव शामराव देशमुख यांचे जीवन चरित्र.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!