२० डिसेंबर माता भिमाई रामजी आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

0

भीमाबाई धर्मा पंडित(मुरबाडकर) किंवा भीमाबाई रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 मध्ये आंबेटेंभे या ठिकाणी झाला. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या


इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह रामजी सकपाळ यांच्याशी विवाह झाला. इ. स. १८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत नाईक पदावर होते. “रामजी राजबिंडा, बुध्दिमान , धैर्य, शौर्य यांचा संगम असलेला, तारुण्यानं मुसमुसलेला तरुण होता, त्यांच्यात ज्ञान , विनय, आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम होता..”असे लेखकाने केलेले वर्णन चपखल आहे.

    रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता. रामजी ज्या पलटणीत होते. ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती.

        सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिमा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.

    आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह रहाण्यासाठी आले.


        दापोली कॅम्पात अधिकारांवरून, पंथावरून, राहणीमानावरून, पैशावरून वादविवाद होत असत. लष्करातील प्रस्थापितांच्याकडून उच्चनिच्चपणामुळे मनाला चटके सहन करावे लागले. मुलांच्या खेळण्यावरून, तळावरील पाण्यावरून,त्यांची मुले व बायका भीमाबाईबरोबर सतत भांडू लागले, त्यामुळे इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे येऊन ते राहिले.

      रामजी सकपाळ यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. 


        इ.स. १८९६ मध्ये रामजी कबीरपंथी झाले, त्यांनी संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचार आणि तत्वज्ञान यांचे बाळकडू बाबासाहेबांना पाजले होते. भीमाबाईच्या मनात सुद्धा कबीरांविषयी अपार श्रद्धा होती.साताऱ्यात आल्यावर बाबासाहेबांना ‘ कॅंप,स्कूल’ मध्ये घातले,”मुलाचे पाय पाळण्यात दिसतात”असं त्यांच्या बाबतीत रामजी, भीमाबाई सह शिक्षकांना ही वाटू लागले.

        रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.

        वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच शाळेत कुशाग्र बुद्धीचे व हजरजबाबी, हुशार म्हणून बाबासाहेबांचे कौतुक होत होते, आणि अशा सुखासमाधानाचा व श्रमसाफल्याचा काळ आला असतांनाच मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, सुभेदार रामजीच्या कुटुंबांवर जणू आभाळ कोसळले.
 
 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

  माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!