१५ डिसेंबर छत्रपती शाहूराजे भोसले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

0

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. 

त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी माणगाव जवळील गांगुली गावात झाला. ते छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे पुत्र होते.

१८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले . हाच संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहास मध्ये अजरामर झाले. त्याचवेळेस लाखो सेना सागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता . संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते . नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला. त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता . रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले .तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता . ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन , औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले . दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते . औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहु ह्यांची सुटका झाली. आणि खऱ्या अर्थाने शाहु महाराज इतिहास घडण्यास सुरुवात झाली

        छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!