१४ डिसेंबर ग. दि. माडगूळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

0

गीत रामायणासारख्या अजरामवर काव्याचे गीतकार आणि थोर कवी ग. दि. माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


गजानन दिगंबर माडगुडकर (१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे भारतातील एक मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेता होते . तो त्याच्या मूळ राज्यात ग दी मा या नावाने प्रसिद्ध आहे . त्यांना 1951 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 1969 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्क्रीन प्ले आणि 2000 हून अधिक गाणी लिहिली आहेत. गीत रामायण (गीतातील रामायण) ही सर्वात उल्लेखनीय रचना असल्यामुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी (आधुनिक वाल्मिकी) म्हटले गेले . 2019 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाते. या सोहळ्याला अनुसरण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करते.



        गीतरामायण (इंग्रजी: The Ramayana in Songs) हा मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो. भारतात दूरदर्शन सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी, १९५५-५६ मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राद्वारे ते प्रसारित केले गेले. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. गीतरामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी खूप गाजले. १९५६ या वर्षी माडगुळकरांचे गीतरामायण पुस्तक रुपाने भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.

        गीतरामायण हे "मराठी प्रकाश संगीताचा मैलाचा दगड" आणि रामायणाची "सर्वात लोकप्रिय" मराठी आवृत्ती मानली जाते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला.


गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म


        इ.स.१९५४च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार इ.स. १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणे' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हापासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.

गीत रामायणातील गीतांची रचना छंदवृत्तांमध्ये केली गेली. गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे गीतरामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्याशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले- उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी- दशरथा घे हे पायसदान. . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहेत, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.

        'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली', 'भावास्तव मी वधिले भावा', 'तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो', 'मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनांतून कल्पनारम्यता; 'फुलापरी ते ओठ उमलती', 'ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनांतून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात 

        माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे. या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.

संगीत


        सुधीर फडके (उर्फ, बाबूजी) यांनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली. मनसा नारायण यांच्या मतानुसार, मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, यांमुळे जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. एकप्रकारे सुसंस्कार करणाऱ्या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता.

        मायबोली संकेतस्थळावरील एक लेखक, श्री गजानन यांच्या मतानुसार, गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, राग भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.

        २६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.

        अमित करमरकर यांच्या मतानुसार, सुधीर फडक्यांना या गीतांच्या संवर्धनासाठी पुढे अनेक वर्षे मिळाली आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मूळ गाण्यांपेक्षा फडक्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित झालेली (१९६५ आणि १९७९) गीते कितीतरी सरस आहेत. निव्वळ सांगीतिक मूल्यांचा विचार करता गीत रामायणातील स्वररचना अत्युच्च दर्जाच्या नाहीत. परंतु त्या काळजाला अशाप्रकारे भिडतात की त्या-त्या प्रसंगासाठी, तो-तो भावार्थ व्यक्त करण्यासाठी त्या केवळ आदर्शच वाटतात. जर ही पदे लिहिताना गदिमा "माध्यम" झाले असतील तर ह्या पदांचे सादरीकरण करताना सुधीर फडके त्या-त्या व्यक्तिरेखा जगले आहेत. सुधीर फडके यांनी ती पदे, ते विचार, ते प्रसंग फक्त रसिकांपर्यंत पोचवले आहेत. मला गाण्यातील किती येते, किती कळते हे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. 'गदिमांचे 'पायसदान' फडक्यांनी अगस्ती ऋषींच्या बाणात रूपांतरित केले आहे. त्यात सेवाभाव आहे, स्वत्वला दिलेली तिलांजली आहे.' 

        आपल्या रसग्रहण लेखात अमित करमरकर पुढे म्हणतात, गीतरामायणातील रचना अगदी साध्या आहेत असे नाही. 'शुद्ध सारंग'मधील 'धन्य मी शबरी श्रीरामा' गाऊन बघा. या कडव्यामधील स्वरलगाव आणि कणस्वर फक्त बाबूजीच घेऊ जाणोत. तसेच 'चला राघवा चला'. गदिमांनी त्यात ’ज्या शब्दांनी एका वाक्याची अखेर करायची त्याच शब्दांनी दुसऱ्या वाक्याची सुरुवात' असा प्रयोग केला आहे. पण ते कानांना खटकत नाही. कारण ते ओढून-ताणून केलेले नाही. सहज स्फुरले आहे. 

        गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर यांनी गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत.

आकाशवाणी प्रसारण


            पुण्याच्या आकाशवाणी, केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले.१ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!